धक्का लागल्याचे कारण ः एकाला बेदम मारहाण

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः दांडिया खेळताना धक्का लागण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना राजीव गांधी स्टेडियम सिडको एन 6 परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीवर सिडको पोलिसांना दाखल करण्यात आला आहे. प्रतीक मिलिंद साबळे (वय 18) रा. आंबेडकर नगर गल्ली नंबर 7 यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार एक ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या मित्रासोबत राजीव गांधी स्टेडियम येथे दांडिया खेळण्यासाठी गेले होते. दांडिया खेळताना आरोपीला फिर्यादीचा धक्का लागला. यावेळी तू मला धक्का का मारला असे म्हणून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच इतर चार मुलांसह फिर्यादीला हातातील लोखंडी कड्याने कपाळावर डोक्यात मारून जखमी केले. सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः अज्ञात वाहनाच्या धडकेत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना धूत हॉस्पिटल समोर घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभागा संपत जाधव (वय 65) रा. सावखेडा भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फकीरा संपत जाधव यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 1 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या आई चंद्रभागा या धूत हॉस्पिटल समोरून रामनगरकडे पायी जात होत्या. त्यावेळी अज्ञात मोटरसायकल स्वाराने दिलेल्या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलेटच्या धडकेत एक जण गंभीर


छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः भरधाव बुलेटच्या धडके एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मोहटा देवी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुज दीपक देशमुख रा. वडगाव कोल्हाटी असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रकला सुधीर मिसाळ रा.संघर्ष कॉलनी क्रांतीनगर साजापूर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी या पतीसह मोटरसायकलवर जात होत्या. त्यावेळी आरोपीने विना क्रमांकाची बुलेट भरधाव वेगाने चालवून पतीच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले. वाळुज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.